सांगली जिल्ह्यातील विविध मार्गांवर आलेल्या पाण्यामुळे एसटी सेवा बंद
सांगली जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याचशा मार्गावर पाणी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस.टी. सेवा बंद केले आहे.
एसटी सेवा बंद केलेले मार्ग पुढीलप्रमाणे
सांगली-पलूस नावरसवाडी पुलावर पाणी, सांगली-इस्लामपूर कर्नाळ चौक येथे पाणी, इस्लामपूर – कोल्हापूर किणी टोल नाका येथे पाणी, तासगाव-कराड ताकारी येथे पाणी, शिराळा-मणदूर आरळा येथे पाणी, शिराळा- बांबवडे सांगाव येथे पाणी, शिराळा-मांगले मांगले रोडवर काखे पुलावर पाणी, शिराळा-कोल्हापूर किणी टोल नाका येथे पाणी, पलूस-अमणापूर अमणापूर पुलावर पाणी, पलूस-भिलवडी भिलवडी येथे पाणी, पलूस– इस्लामपूर ताकारी येथे पाणी, कोल्हापूर – रत्नागिरी आंबा घाट पाणी, सांगली-चिपळून पाटण येथे पाणी, सांगली-कोल्हापूर कोल्हापूर हायवेवर पाणी आल्याने सद्यस्थितीत एसटी सेवा बंद करण्यात आले आहे. असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून कळविण्यात आलेले आहे.