Sangali District Bank Election | भाजप खासदार संजय काका पाटील यांनी घेतली माघार…

Sangali District Bank Election | भाजप खासदार संजय काका पाटील यांनी घेतली माघार…

Published by :
Published on

संजय देसाई | सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेल विरुद्ध भाजपाचे शेतकरी विकास पॅनल,अशी सरळ लढत होणार आहे,अर्ज माघार नंतर आघाडीच्या 3 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भाजपाचे खासदार आणि विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी आपला व आपल्या उमेदवारांचे अर्ज माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लढतीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी एकत्र येत सहकार विकास पॅनल उभे केले आहे,तर भाजपा शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून स्वबळावर लढत आहे.पण या निवडणुकीमध्ये भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी माघार घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी तब्बल 306 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते,आज अर्ज माघारीच्या नंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.यामध्ये शिराळयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरचे शिवसेना आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसचे नेते महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र भाजपाची यादी अद्याप जाहीर झालेले नाही,कारण ऐनवेळी भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी स्वतःसह आपल्या कार्यकर्त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे, त्यामुळे भाजपाची काहीशी कोंडी झाली आहे.मात्र भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या बाजूला खासदार संजयकाका पाटील यांनी घेतलेल्या माघारीमुळे राजकीय चर्चेला देखील उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com