मनसे नेते संदीप देशपांडे यांची अमोल मिटकरी यांच्यावर टीका, म्हणाले...
पुण्यातील पूरपरिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांना टोला लगावला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातील दिलेल्या प्रतिक्रियेवर टीका केली. यावर आता संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदिप देशपांडे म्हणाले की, अमोल मिटकरींचे असं झालंय की, अजित पवार साहेबांमुळे मिळालेली विधानपरिषद आहे. त्यामुळे कुणी काय बोललं त्यांना उत्तर द्यायचं आहे.
मला तर वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अमोल मिटकरींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्ही ज्या काही भूमिका घेतल्या त्या लोकांसमोर घेतल्या. खुलेआम घेतल्या. त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही. जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली, लोकांसमोर घेतली. आम्हाला कधी मास्क लावून, रात्री अपरात्री चेहरे लपवून आम्हाला कुठे फिरावं लागले नाही. त्यांच्या त्यांच्या नेत्यांना फिरावं लागते. त्यामुळे पहिले त्यांनी त्यांच्या नेत्यांची काळजी करावी.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, ज्यांना तोंड लपवून सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. त्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. चुकीचं झालं तर चुकीचं बोलायचं नाही का? ज्यावेळी लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता. आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करत आहे तर त्याच्यावर बोलणार नाही का? आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत याच्यााधी भाजपबद्दल किती बोलत होते. असे संदिप देशपांडे म्हणाले.