समीर वानखेडेंची जात पडताळणीच झाली नाही? RTI मधून माहिती आली समोर

समीर वानखेडेंची जात पडताळणीच झाली नाही? RTI मधून माहिती आली समोर

Published by :
Published on

रुपेश होले | एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची जात पडताळणीच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी महितीचा अधिकाराअंतर्गत मागवलेल्या महितीतून ही बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता राज्य अथवा केंद्राच्या सेवेत रुजु होताना समीर वानखेडेंनी नेमके कोणते जात प्रमाणपत्र दाखवले होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई कार्यालयाकडे समीर ज्ञानदेव वानखडे यांना देण्यात आलेले जात प्रमाणपत्र व सोबत त्यांच्या नावे जात प्रमाण पडताळीसाठी जे कागदपत्र जमा करण्यात आली आहे. याची साक्षांकित प्रत मिळाण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता.

या अर्जावर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबईकडून शहर कार्यालयाचा अभिलेख तपासला असताना समीर ज्ञानदेव वानखडे यांच्या नावे जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य अथवा केंद्राच्या सेवेत रुजु होताना समीर वानखेडेंनी नेमके कोणते जात प्रमाणपत्र दाखल होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com