sambhaji raje and tuljapur temple
sambhaji raje and tuljapur temple team lokshahi

संभाजीराजेंना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवलं, सकल मराठा समाजाची आज तुळजापूर बंदची हाक

शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजीराजे नाराज
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांना सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. या प्रकारमुळे तुळजापूरात खळबळ उडाली आहे. परिणामी संभाजीराजेंना अशा प्रकारची वागणूक दिल्याप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज (12 मे ) तुळजापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. समस्त तुळजापूरकर आणि सकल मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

sambhaji raje and tuljapur temple
Ramessh Latke Passes Away : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

छत्रपती संभाजीराजे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळच्या सुमारास ते कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले. तिथे त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. कुठलासा नियम सांगत व्यवस्थापनाने संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला. राजेंना प्रवेश नाकारल्यापासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

sambhaji raje and tuljapur temple
दुकानांवरील पाट्या मराठीत नसल्यास होणार कारवाई; दुकानदारांना अल्टीमेटम

छत्रपती संभाजी राजे यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू किंवा कृती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कवायत कलम ३६ नुसार कुळाचार विधी व्यतिरिक्त कमाविसदार पुजारी यांचे व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही, असा नियम आहे. करवीर संस्थान व संभाजीराजे छत्रपती यांच्या कालच्या गैरसोयीच्या कारणाने शासनाला कलम ३६ आणि उच्च न्यायालयातील प्रकरणाबद्दल सरकारकडे अहवाल पाठवला जात आहे. करवीर संस्थांनची मानाची पूजा छत्रपती संभाजीराजे यांच्या आगमनापूर्वी झालेली होती. यानंतर ते दर्शनाला येणार असतील तेव्हा करवीर संस्थानचा अभिषेक त्यांचे आगमन पाहून करावे, जेणेकरून त्यांचे हस्ते दुग्ध अभिषेक होईल, अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत.

sambhaji raje and tuljapur temple
राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; MRI रुममधील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com