३१ डिसेंबरला साई मंदिर बंद राहणार

३१ डिसेंबरला साई मंदिर बंद राहणार

Published by :
Published on

कुणाल जमदाडे, शिर्डी | येत्या 31 डिसेंबरला रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान साईमंदिर बंद राहणार आहे. नवीन वर्षानिमित्त लाखो भाविक शिर्डीला साईंचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. साईमंदिर प्रशासनाचं या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वच सज्ज झाले आहेत.यावेळी काही नागरीक पार्ट्या करून सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. तर काही जणांचा देवदर्शनाकडे कल असतो. मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यानिमित्त जर तुम्ही साईं दर्शन घेण्याच्या विचारात असाल, तर ते यावर्षी शक्य नाही आहे. कारण साई संस्थानने ३१ डिसेंबरला साईंचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर साईसंस्थानने हा निर्णय घेतला.

नवीन वर्षानिमित्त लाखो भाविक शिर्डीला साईंचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी येत्या 31 डिसेंबरला रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान साईंचे मंदिर बंद राहणार आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी साईबाबांचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. या संबंधित सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर साईसंस्थानने हा निर्णय घेतला. तसेच १ जानेवारीला सकाळी सहा वाजता शिर्डीचं साईमंदिर उघडणार आहे. त्यामुळे थेट नवीन वर्षाला भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com