महाराष्ट्र
सात मेट्रिक टन रांगोळीतून शिर्डीत साकारली साई बाबांची प्रतिमा | Drone Video
रामनवमीनिम्मित शिर्डीत ही साई बाबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
कुणाल जमदाडे : शिर्डी | रांगोळीच्या माध्यमातून तब्बल एक एकर क्षेत्रावर साईबाबांची भव्य प्रतिमा रामनवमी निम्मित साकारण्यात आलीये. ही प्रतिमा यंदाच्या श्रीरामनवमी यात्रेचं आकर्षण ठरणार आहे. त्यासाठी देशाला रांगोळी पुरवणाऱ्या छोटा जयपूर येथून तब्बल सात मेट्रिक टन रांगोळी मागविण्यात आली होती. तर रांगोळी साकार करण्यासाठी त्या जागेवर दोन एकर क्षेत्र गायीच्या शेणाने सारविण्यात आले.
मुंबईतील सत्तावीस रांगोळी कलाकारांचं पथक शिर्डीत दाखल झालं होतं. त्यांच्या मदतीसाठी विविध राज्यांतील सुमारे चारशे कलाकारांनी आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली होती. आज सायंकाळच्या सुमारास रांगोळी पूर्ण झाली. रांगोळीच्या माध्यमातून साईबाबांची प्रतिमा साकारलेलं ड्रोन कॅमेऱ्यातुन टिपलेलं विहंगम दृश्य सध्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारं ठरतंय.