बल्लारपूरचे सागवान खुलविणार पीएमओचे सौंदर्य

देश विदेशात 'गोल्डन वूड' नावाने प्रसिद्ध असलेले बल्लारपूर आगारातील सागवान लाकूड नवीन संसद, उपराष्ट्रपती भवन व अयोध्येतील राममंदिराची शोभा वाढविण्यास उपयुक्त ठरले होते.
Published by :
shweta walge

देश विदेशात 'गोल्डन वूड' नावाने प्रसिद्ध असलेले बल्लारपूर आगारातील सागवान लाकूड नवीन संसद, उपराष्ट्रपती भवन व अयोध्येतील राममंदिराची शोभा वाढविण्यास उपयुक्त ठरले होते. आता पंतप्रधान कार्यालयाचे सौंदर्य खुलविण्यासाठी येथील लाकडांचा वापर केला जाईल.

वन विकास महामंडळाला मिळालेल्या डिमांडनुसार आज हे 'गोल्डन वूड' दिल्लीला रवाना करण्यात येणार आहे. बल्लारपुरातील वाहतूक विपणन आगार आणि वन विकास महामंडळाच्या आगारातून सागवान लाकूड खरेदी करण्यासाठी देश- विदेशातील व्यापारी येतात.

हे लाकूड गडचिरोलीच्या जंगलातील असून भारत मंडपम, केंद्रीय सचिवालय, सातारा सैनिक शाळा, नाशिकचे सप्तशृंगी गड, जळगावचे भारतीय पुरातत्त्व विभाग, दादरा नगर हवेली वन विभाग, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमसाठी अशा अनेक ठिकाणी या लाकडाचा वापर झाला आहे. वर्षानुवर्षे कीड व ऊन-पावसाचा अनिष्ट परिणाम होत नाही, हे या लाकडाचे वैशिष्ट्य आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com