महाराष्ट्र
राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्यांचे ‘रेस्क्यू’, सदाभाऊ खोत घटनास्थळी
वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या लोकांना व्हाईट आर्मीच्या बोटीमधून आमदार सदाभाऊ खोत यांच्यासोबत रेस्क्यू टीमने बाहेर काढलं.
वारणा – कृष्णा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून सांगली जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कणेगावात राष्ट्रीय महामार्गावर काहीजण अडकले होते. याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांना मिळताच त्यांनी व्हाईट आर्मीच्या टीमसोबत जाऊन अडकलेल्या व्यक्तींना मदत पोहोचवली. अडकलेल्या लोकांना बोटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले.
कणेगाव व भरतवाडी ही गावे महापुरामध्ये गेली अनेक वर्षेपासून बुडत आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने जमीनही ताब्यात घेतली आहे. पण अजून या गावांचे पुनर्वसन झालेले नाही. आता तरी सरकार याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केली.