पूरग्रस्तांना वेळेत मदत न दिल्याच्या निषेधार्थ मोर्चा

पूरग्रस्तांना वेळेत मदत न दिल्याच्या निषेधार्थ मोर्चा

Published by :
Published on

शासन पूरग्रस्तांना वेळेवर मदत करत नसल्याच्या निषेधार्थ 17 ऑगस्ट रोजी सांगलीतील स्टेशन चौक येथे सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

सांगली जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली.
सदर बैठकीमध्ये पूरग्रस्तांच्या समस्या,पंचनामे, नुकसान भरपाई याबाबत सहभागी सदस्यांनी एकत्र येऊन चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याप्रकरणी सर्व सदस्यांनी त्याचा निषेध नोंदवला.

पूर उतरून एक महिन्याचा कालावधी उलटून देखील वस्तुस्थिती वरती आधारित पंचनामे झाले नसल्याबद्दल, विविध घटकांचे नुकसान भरपाईचे निकषांबाबत स्पष्ट आदेश नसलेबाबत आणि पूरग्रस्तांच्या करावयाच्या मदतीत होत असलेल्या दिरंगाईबाबत 17 ऑगस्टला सांगतील स्टेशन चौक येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सदर बैठकीस जिल्ह्यातील आमदार नेते तसेच सर्व पक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com