वाझे प्रकरणात एनआयएनं कोर्टात व्यक्त केली ‘ही’ भीती

वाझे प्रकरणात एनआयएनं कोर्टात व्यक्त केली ‘ही’ भीती

Published by :
Published on

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात तुरुंगात आहेत. वाझेंवर अलीकडेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना घरी तात्पुरतं नजरकैदेत ठेवण्यात यावं, अशी मागणी वाझेंनी केली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला विरोध केला आहे. वाझेंची नजरकैदेची याचिका मंजूर झाल्यास ते फरार होऊ शकतात, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे. सुरक्षित, स्वच्छ आणि तणावमुक्त वातावरणात राहून लवकर बरे होण्यासाठी वाझेंनी विशेष न्यायालयाकडे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती नजरकैद देण्याची परवानगी मागितली होती. तसेच नजरकैदेत असताना सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत त्यांच्या घरी त्यांच्या वकिलाशी वैयक्तिक सल्लामसलत करण्याची परवानगीही मागितली होती.

एनआयएने वाझेंना नजरकैदेस मंजुरी देण्यास विरोध केला आहे आणि ते कायद्याच्या आणि न्यायाच्या विरोधात असल्याचं म्हटलंय. तसंच तळोजा मध्यवर्ती कारागृहाशी संलग्न मुंबईतील रुग्णालये वाझेंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व सुविधांसह पूर्णपणे सक्षम आहेत. तसेच वाझेंचा अर्ज गृहितकांवर आणि अनुमानांवर आधारित होता. त्यांनी खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार, याच्या अचूक तारखेबद्दल याचिकेत कोणताच उल्लेख केलेला नाही, असंही म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com