Sachin Tendulkar at 50 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चित्र साकारले बॅटवर

Sachin Tendulkar at 50 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चित्र साकारले बॅटवर

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा आज 50 वा वाढदिवस आहे.
Published on

वसई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा आज 50 वा वाढदिवस आहे. यानिमित्त वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी मिनीचर बॅटवर सचिनच्या जीवनातील महत्वपूर्ण पैलू रेखाटले आहे. भारतरत्न पद्मविभूषण, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या कलाकृतीतून साकारले आहेत.

Sachin Tendulkar at 50 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चित्र साकारले बॅटवर
बाजार समितीत सत्तेसाठी विरोधकांचा हातात हात! राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजपा-काँग्रेस-ठाकरे गट एकत्र

या चित्रांमध्ये सचिन तेंडुलकरचा लहानपासूनचा प्रवास दाखवलेला आहे. सचिन तेंडुलकर यांचे गुरुवर्य स्वर्गीय रमाकांत आचरेकर सर ते जे कॅप घालत असत त्यावर फुलं दाखवलेली आहेत. तसेच, 2011 साली जिंकलेला वर्ल्डकपही चित्रारुपात साकारला आहे. तसेच, तिमिरातूनी तेजाकडे या चित्रात आपल्याला पाहायला मिळते.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. जगातील पहिला असा खेळाडू आहे की 100 सेंचुरी त्यांच्या नावावर आहेत. ही कलाकृती करत असताना चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी अवघ्या दोन तासांमध्ये हे चित्र पूर्ण केलेले आहे. या कलेचे कौतुक बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील साहेबांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com