Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarTeam Lokshahi

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक

नागपूर येथे घेतला अखेरचा श्वास
Published on

अनिल ठाकरे | नागपूर : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना आज पितृशोक झाला आहे. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार (Sachchidanand Mungantiwar) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ९१ वर्षाचे होते. नागपूर येथील किंग्‍जवे या रूग्‍णालयात त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

Sudhir Mungantiwar
Nana Patole : गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर..

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍त परिवार आहे.

Sudhir Mungantiwar
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; BMC अलर्टवर

सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे पार्थिव शनिवार ४ जून रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायं. ४.३० वा. त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

Sudhir Mungantiwar
पृथ्वीराज चव्हाण- राहुल गांधींची चार वर्षांपासून भेट नाही, कारण...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com