लस घी.. घेवं माय…नको ना बाई लै भ्या वाटतं.. – लसीकरणाला घाबरलेल्या आजीबाई अन आरोग्यसेविकांचा आग्रह करणारा संवाद

लस घी.. घेवं माय…नको ना बाई लै भ्या वाटतं.. – लसीकरणाला घाबरलेल्या आजीबाई अन आरोग्यसेविकांचा आग्रह करणारा संवाद

Published by :
Published on

संदीप जेजुरकर
लसीकरणाची भिती वाटणाऱ्या एका आजीबाईंना आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनवण्या करून लसीकरण करून घेतल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील मटाने गावातील हा व्हिडिओ आहे.


आरोग्य सेविका लसीकरणासाठी शेत शिवारातून फिरत असतांना जिजाबाई सावंत ह्या शेतमजूर आजींना त्यांनी लस घेण्याबाबत विनंती केली. मात्र आजी भीतीपोटी लस घेण्यास नकार देत होत्या. मात्र आरोग्य कर्मचारी व आजोबा दत्तू सावंत यांनी आईंना विश्वासात घेत अखेर लस दिली. दरम्यान, आजीचा व आरोग्यसेविकांचा अहिराणी संवादाचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com