रूपाली चाकणकरांचा फोटो फेसबुकवरील अश्लील पेजवर अपलोड; तक्रार दाखल

रूपाली चाकणकरांचा फोटो फेसबुकवरील अश्लील पेजवर अपलोड; तक्रार दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहे.
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहे. असाच धक्कादायक प्रकार पुण्यातूनही समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा फोटो फेसबुकवरील एका अश्लील पेजवर अपलोड करण्यात आला आहे. याप्रकरणी रुपाली चाकणकरांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, रूपाली चाकणकर यांचा फोटो फेसबुकवरील एका अश्लील पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या फेसबुक पेजवर अन्य महिलांचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडीओ आढळून आले आहे. देसी ब्युटी असे या फेसबुक पेजचे नाव आहे. या पेजवर ४ दिवसांपूर्वी चाकणकर यांचा फोटो कोणी अज्ञात व्यक्तीने अपलोड केला. या प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी केली महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत राज्य महिला अध्यक्षांचा फोटो कोणी अपलोड केला याचा शोध पोलीस घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com