पाहा १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू असणारे नियम

पाहा १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू असणारे नियम

Published by :
Published on

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यायातच टास्क फोरने येत्या काही दिवसात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ शकते असा अंदाज लावला आहे. याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउनसंदर्भात प्रशासकीय यंत्रणांना तयार राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत.

१५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू असणारे नियम

  • होम आयसोलेशच्या बाबतीत उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.
  • कोविड रुग्ण असल्याबाबत संबधित स्थळी दरवाज्याच्या १४ दिवसांसाठी सूचना फलक लावण्यात येईल.
  • गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल
  • खाजगी आस्थापनांत ५० टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विभाग किंवा प्रमुख कोविड परिस्थितीनुसार कर्मचारी संख्या निश्चित करतील.
  • उत्पादाब क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवू शकते.
  • शासकीय कार्यलयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवशयक आणि तत्काळ कामांसाठी प्रवेशाची परवानगी देण्यात येईल.
  • बैठका आदी कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा
  • विभाग प्रमुखाने पाहावे.
  • ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री 8 ते सकाळी 8 या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे .
  • या वेळेत सागरी किनारे, उद्याने, बागा बंद राहतील
  • कुठलेही सामाजिक,धार्मिक, राजकीय, मेळाव्यांना परवानगी नाही.
  • या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.
  • विवाह समारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
  • अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे.
  • सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चीत करावे.
  • त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत पाहावे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com