सेना-भाजप राड्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका आली समोर…

सेना-भाजप राड्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका आली समोर…

Published by :
Published on

शिवसेना भवनाबाहेर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. या राड्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. यावर आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांची भूमिका समोर आली आहे.

शिवसेना भवन समोर शिवसेना विरुध्द भाजपा असा झालेल्या वादात मोठी हाणामारी झाली. पोलिस ठाण्यात ही प्रकरणेही गेली. यावर सर्वच नेते संतप्त प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरव मांडण्यात आली आहे.

यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर, माहीम आणि वडाळा विभागातील शिवसैनिकांची भेट घेतली आहे. यामध्ये त्यांनी नक्कीच काळजीपूर्वक विचारणा केली आहे. शिवसेनेकडून हा अधिकृत फोटो ट्वीट करण्यात आला आहे, या फोटोला शिवसेना आणि शिवसेना प्रमुख असे आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे. दरम्यान या कॅप्शनमध्ये जास्त काही लिहिण्यात आले नसले तरी बुधवारच्या वादानंतर झालेली ही भेट खूप काही सांगून जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com