मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; रोहित पवार ट्विट करत म्हणाले...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी मोठी घोषणा केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, अभिजात भाषेच्या दर्जासाठी सुरु असलेला #मराठी_भाषेचा संघर्ष यशस्वी झाला असून २०१३ मध्ये पठारे समितीने दिलेल्या अहवालावर अखेर निर्णय झाला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या संस्था, साहित्यिक, नागरिक तसेच केंद्र-राज्य सरकार, सर्व राजकीय पक्षांचे देखील आभार! असे रोहित पवार म्हणाले.