राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचे उत्तर
राज ठाकरेंनी एका मुलाखातीत राष्ट्रवादीच्या उदयानंतर जाती-जातींमध्ये द्वेष वाढला,असं वक्तव्य केलं होत.त्यांनतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता.आता याप्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यचा अर्थ सांगितला आहे.अर्थ सांगताना रोहित पवारांनी भाजपला कोपरखळ्या मारल्या आहेत.
रोहित पवार म्हणाले, "राज ठाकरे हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ' च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो"
"राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!" असे रोहित पवार ट्वीटद्वारे म्हटले आहेत.