Rikshaw-Taxi
Rikshaw-TaxiTeam Lokshahi

मुंबईमधील रिक्षा-टॅक्सीच्या दरामध्ये होणार भाडेवाढ?

Rikshaw-Taxi च्या दरामध्ये भाडेवाढसंबंधी परिवहन मंत्री म्हणाले...
Published on

मुंबई : पेट्रोल-डीझेलसह (Petrol-Diesel) अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्याने देशभरात महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशातच मुंबईमधील रिक्षा-टॅक्सीच्या (Rikshaw-Taxi) दरामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.

Rikshaw-Taxi
सोनिया गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधीही कोरोना पॉझिटीव्ह

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या किंमतींमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे सध्याच्या दरांमध्ये प्रवासी वाहतूक करणं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परवडत नाही. म्हणूनच दरवाढीची मागणी सातत्याने रिक्षा-टॅक्सी चालक युनियनतर्फे करण्यात येत आहे. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने सर्वसामन्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.

Rikshaw-Taxi
New Train मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच तासांत

अनिल परब यांनी गुरुवारी 2 जून रोजी आरटीओच्या फेसलेस योजनेच्या शुभारंभाप्रसंगी टॅक्सी आणि रिक्षाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय आमच्या विचाराधीन आहे, असं मत व्यक्त केलं होतं. यावर रिक्षा-टॅक्सी चालक युनियनतर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Rikshaw-Taxi
अमरावती-अकोला मार्गाचा होणार जागतिक विक्रम, चार दिवसांत 75 किमी मार्ग
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com