'राज'सभेसाठी मोफत रिक्षा संकल्पना; 300 रिक्षांमधून मनसैनिकांना देणार मोफत प्रवास
सचिन बडे, औरंगाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला गुरूवारी पोलीसांनी सशर्त परवानगी दिली. या परवानगीनंतर आता मनसैनिकांकडून जोरदार तयारी सूरू आहे. त्यात आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेसाठी शहरातील रिक्षावाले एकवटले आहेत. हे रिक्षाचालक (Auto Driver) मनसैनिकांना मोफत प्रवास घडवणार आहेत.
औरंगाबादमधील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला काही पक्षांचा विरोध आहे, तर काहींचा पाठींबा आहे. त्याता आता रिक्षावाले सुद्धा या सभेसाठी सज्ज झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त मनसैनिक पोहोचावे यासाठी 300 रिक्षा मोफत धावणार आहे. या रिक्षा त्या मनसैनिकांपर्यत पोहोचण्यासाठी या रिक्षांचे मागे सभेचे बॅनर ही लावण्यात आले आहेत. जेणेकरून या रिक्षा मोफत असल्याचे मनसैनिकांना कळेल.
राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेसाठी 300 रिक्षांमधून मोफत प्रवास दिला जाणार आहे. यासाठी 180 रिक्षा भाडोत्री बुक केल्या आहेत, तर आणखी 120 रिक्षा बुक केल्या जाणार आहेत. या प्तत्येक रिक्षावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे बॅनर आणि फोटो असणार आहेत. औरंगाबाद येथील कर्णपुरा परिसर ते राज ठाकरे यांच्या सभेच्या मैदानापर्यंत मनसैनिकांना प्रवास निशुल्क करता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सभेला यावे यासाठी मनसेची ही मोफत रिक्षा संकल्पना आहे.