दिवेआगर येथील सुवर्ण गणेश पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा
23 मार्च 2012 दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करून दिवेआगरच्या मंदिरातील सुवर्ण गणेशाचा मुखवटा व दागिने मिळून 1 किलो 600 ग्राम सोने पळवून नेले होते . त्यानंतर पोलिसांनी तपास करून दरोडेखोरांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून वितळलेल्या मुखवट्याचे 1 किलो 361 ग्राम सोने लगडीच्या स्वरूपात हस्तगत केले होते. सुवर्ण गणेश पुनर्स्थापनेचा विषय चर्चेत होताच.
दिवेआगर गावाचे वैभव असलेले सुवर्ण गणेश पुनर्स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबईमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधितांना निर्देश दिले . लाखो गणेशभक्तांची हे आनंदाची बातमी आहे. सध्या हे सोने श्रीवर्धन उपकोषागारात पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे आता या सोन्यापासून सुवर्ण गणेश मुखवटा तयार करून त्याची प्रतिष्ठापना करावी अशा सूचना रायगड जिल्हा प्रशासन व सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांना देण्यात आल्या आहेत.अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.