राज्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता,  उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवणार

राज्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवणार

Published by :
Published on

राज्यातील कोरोनाचा आलेख खालावत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्या संदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली. त्यासोबत अम्युझमेंट पार्कदेखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.

वर्षा येथे टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यावेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्यदेखील उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com