बीडमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा; लॉकडाऊनमध्ये शिथिलता
बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कालावधीत व्यापार आणि उद्योगधंदे करण्याची परवानगी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यामध्ये वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेतला धनंजय मुंडेंनी बीडचे पालकमंत्री या नात्याने लॉकडाऊनचे निर्बंध सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिथिल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मात्र, असं करताना त्यांनी नागरिकांना देखील "आपली जबाबदारी ओळखून करोनाविषयक नियमांचं पालन करावं", असं आवाहन केलं आहे.धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
निर्बंधांमध्ये मिळालेल्या शिथिलतेमुळे सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीमध्ये व्यापार आणि उद्योगधंदे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक व्यापारी संघटनांनी धनंजय मुंडेंचे यामुळे आभार मानले.