महाराष्ट्र
बंडखोर आमदारांना दिलासा, 11 जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई होणार नाही
आता आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी सांगितलं.
आजचा दिवस एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जातोय. महाराष्ट्रातील राजकीय राडा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला असून अवघ्या देशाच्या नजरा महाराष्ट्रावर लागल्या आहेत. कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं एकनाथ शिंदे गटासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय. अशातच आता आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी सांगितलं.
यावर शिंदे गटाच्या वकिलांनी हे विधान रेकॉर्डवर घ्यावं अशी विनंती केली. सिंघवी यांनी यावर सांगितलं की, सामान्यत: कोर्ट अध्यक्षांच्या वतीने केलेले विधान रेकॉर्ड करणार नाहीत. कारण ते त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासारखं आहे.