कैद्यांना दिलासा; वकील, कुटुंबियांना भेटता येणार

कैद्यांना दिलासा; वकील, कुटुंबियांना भेटता येणार

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्यातील कारागृहातील कैद्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता कैद्यांना पुन्हा वकील व कुटुंबातील सदस्यांची भेट घेता येणार आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये कैद्यांना कुटुंबियांशी भेटण्यास मनाई करण्यात आली होती.

महाराष्ट्र कारागृहातील कैद्यांना पुन्हा वकील व कुटुंबातील सदस्यांची भेट घेता येऊ शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून भेटणे बंद करण्यात आले होते, पंरतू आता महाराष्ट्रातील तुरूंगात सोमवारी कैद्यांचे कुटूंबिय पुन्हा भेट घेवू शकणार आहेत. तर आर्थर रोड जेल (मुंबई सेंट्रल जेल) आणि ठाणे कारागृहात बुधवारपासून वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जवळपास एक वर्षानंतर कैदी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकतील.

महाराष्ट्र कारागृहांचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी या संदर्भात संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी समन्वय साधण्यास सांगून महाराष्ट्र राज्यातील सर्व मध्यवर्ती व जिल्हा कारागृह अधीक्षकांना परिपत्रक काढले आहे.

सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, पाच जणांऐवजी केवळ दोनच लोकांना एकाच वेळी भेट दिली जाणार आहे. तसेच 15 वर्षांपेक्षा कमी तर 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना भेट घेता येणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com