तांबडी नदी ओवरफ्लो; गावात शिरले पाणी

तांबडी नदी ओवरफ्लो; गावात शिरले पाणी

Published by :
Published on

नमित पाटील | पालघर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक गावात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, वाडा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. या पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील तांबडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शेवते गावात पाणी शिरले आहे. नदीचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. असंख्य नागरिकांच्या घरांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं मोठे नुकसान झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com