शिक्षकांची भरतीसुद्धा MPSC मार्फत होणार?

शिक्षकांची भरतीसुद्धा MPSC मार्फत होणार?

शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला प्रस्ताव सादर
Published on

पुणे : शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) लवकच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. याआधी पवित्र संकेतस्थळामार्फत (Pavitra Portal) शिक्षकांची भरती करण्यात येत होती.

शिक्षकांची भरतीसुद्धा MPSC मार्फत होणार?
Vinayak Raut : लोकसभा अध्यक्षांनी पक्षपाती निर्णय घेतला

शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले होते. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण असून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com