प्रतिक्षा संपली! १ हजार २५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

प्रतिक्षा संपली! १ हजार २५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदेश दिले आहेत. यामुळे, सुमारे ४ लाख उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
Published on

मुंबई : वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. १ हजार २५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदेश दिले आहेत. यामुळे, सुमारे ४ लाख उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्षा संपली! १ हजार २५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा
आताचं सरकार ही सहारा चळवळ; राज ठाकरेंचा घणाघात, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न...

एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २ हजार १३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टिसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यास यश आले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com