आरबीआयची अभ्युदय बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांचे काय होणार?

आरबीआयची अभ्युदय बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांचे काय होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
Published on

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर मोठी कारवाई केली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी हटवण्यात आले आहेत. या सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गीयांची खाती आहेत. या कारवाईने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

आरबीआयची अभ्युदय बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांचे काय होणार?
शरद पवारांमुळेच राष्ट्रवादी पक्ष मोठा झाला; अजितदादांवर हल्लाबोल, सुनावणीत काय घडलं?

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त केली आहे. संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक असल्याचं आरबीआयने सांगितले आहे.

दरम्यान, आरबीआयकडून बॅंकेवर झालेल्या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. परंतु, बॅंकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com