नरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी

नरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी

Published by :
Published on

महेंद्र वानखडे | मीरा भाईंदर भाजपच्या जिल्हाअध्यक्ष पदी रवी व्यास यांची निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड पक्की केली आहे. या निवडीमुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिची एकहाती सत्ता भाजपकडे आहे. या महापालिकेची सर्व धुरा माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे आहे. मात्र एकतर्फी निर्णयामुळे भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले होते. नरेंद्र मेहता यांच्या विरोधात दुसरा गट स्थापन झाला आहे. त्याचं गटाचे रवि व्यास यांची आज जिल्हाअध्यक्ष पदी निवड झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली. ही निवड एकप्रकारे माजी आमदारांना धक्का मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com