शाईफेक प्रकरणी चौकशीसाठी रवी राणा पोलीस ठाण्यात हजर
सुरज दाहाट/अमरावती : अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपूलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला त्यादिवशी पासून अमरावतीत राजकारण खूप तापलं होतं. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तो पुतळा हटवला आणि 9 फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांवर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शाइफेक केली. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या तक्रारीवरून आमदार रवी राणा यांच्यासह 11 जणांविरुद्ध 307 चा गुन्हा दाखल झाला होता. रवी राणा (Ravi Rana) यांना जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. पण तेव्हा पासून रवी राणा हे पोलीस चौकशीला दाखल न झाल्याने सह्यायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड (Bharat Gaikwad) यांनी दोन वेळा रवी राणांना नोटीसा दिल्या होत्या तर रवी राणा हे दुपारी १.१० मिनिटाने सह्यायक पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.
रवी राणा यांची शाईफेक प्रकरणी पोलीस चौकशी करणार असून रवी राणा यांचा पोलीस जबाब नोंदवनार आहे, तर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात गर्दी जमू नये म्हणून या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली, असून येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात रवी राणांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून मला फसवण्याचा सरकारचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले होते त्यामुळे आता पोलीस चौकशी नंतर रवी राणा हे पोलिसांना सहकार्य करतील का? व चौकशी नंतर रवी राणा हे माध्यमाशी काय बोलतात हे बघावं लागेल.