रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

  • गृह विभागाकडून रश्मी शुक्लांना पदभार स्वीकारण्याचे आदेश

  • आचारसंहिता संपताच रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती

रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर आता संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यातच आता निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांच्या सत्तेचा रजेचा कार्यकाळ संपला असून पुन्हा पदभार स्वीकारावा असा आदेश गृह विभागाने काढला असून रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आचारसंहिता संपताच पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती करण्यात आली असून आजच रश्मी शुक्ला पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com