रश्मी शुक्लांना क्लिन चिट नाहीच! फोन टॅपिंग प्रकरणी 'तो' रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

रश्मी शुक्लांना क्लिन चिट नाहीच! फोन टॅपिंग प्रकरणी 'तो' रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Published on

चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.

रश्मी शुक्लांना क्लिन चिट नाहीच! फोन टॅपिंग प्रकरणी 'तो' रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला
टीईटी घोटाळ्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; अजित पवार म्हणाले, त्यासाठीच लोकांनी निवडून दिलंय

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्याचे फोन टॅपिंग केले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याचा शहर पोलिस तपास करत होते. परंतु, राज्यात सतातंर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो आज फेटाळून लावला आहे.

रश्मी शुक्लांना क्लिन चिट नाहीच! फोन टॅपिंग प्रकरणी 'तो' रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला
मुळा धरणामध्ये आंदोलकांचे उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन; पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. सत्तातंरानंतर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तर, दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे आता अनेक चर्चा रंगल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com