समृद्धी महामार्गाला मेट्रो ट्रेनची जोड,रावसाहेब दानवेंची माहिती
समृद्धी महामार्गाला मेट्रो ट्रेनची जोड देणार असल्याची मोठी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालन्यात भूयारी मार्गाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी दानवे बोलत होते.
समृद्धी महामार्गाला बुलेट ट्रेननं जोडण्याची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दानवे यांच्याकडे केली होती. त्यानुसार समृद्धी महामार्गाला मेट्रो ट्रेनची जोड देणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचा प्रस्ताव सादर होणार आहे. त्यामुळे मुंबई ते जालना प्रवास हा अवघ्या पावने दोन तासात पूर्ण होणार असल्याचं दानवे यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर रेल्वे मालवाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी दिल्ली ते मुंबई असा मालवाहतुकीचा स्वतंत्र ट्रॅक टाकणार असल्याचंही दानवे यांनी सांगतिले.
दरम्यान, विकासाच्या बाबतीत कुणी आमचा बाप काढू नये असं म्हणत खोतकरांचं नाव न घेता दानवेंनी टोला लगावला आहे.