“…पण माझा तर हनिमून झाला” जालन्यात दानवेंची फटकेबाजी

“…पण माझा तर हनिमून झाला” जालन्यात दानवेंची फटकेबाजी

Published by :
Published on

आपल्याकडे पैशाला कुठं कमी आहे, अल्लाउद्दीन का चिराग आहे, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्र जालन्यात पोहोचली. यावेळी रात्री पार पडलेल्या सभेत रावसाहेब दानवे यांची आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली.

त्याचसोबत डॉ. भागवत कराड हे पहिल्यांदा मंत्री झाले. त्यामुळे त्यांची मांडव परतनी झाली. पण माझा तर हनिमून झाला. असं म्हणत दानवेंनी चांगलीच फटकेबाजी केली. दानवे यांच्या या वक्तव्यमुळं उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com