महाराष्ट्र
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांनी नियुक्ती
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी रणजित तावरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घोषित केली होती. अजित पवार देतील तोच उमेदवार असणार आहे. अशी बँकेच्या संचालक मंडळाची भूमिका होती.
पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा होती. आता मात्र पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे हे बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांनी या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.