supriya sule, nawab malik, anil deshmukh
supriya sule, nawab malik, anil deshmukh team lokshahi

Rajya Sabha Election : अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना कोर्ट परवानगी देणार?

अनिल देशमुखांसोबत नवाब मलिकांचाही ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी कोर्टात अर्ज दाखल
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मत गरजेचं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार जेलमध्ये आहेत. हे दोन्ही नेते महाविकास आघाडीतील (mahavikas) आजी आणि माजी मंत्री आहेत. या नेत्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावं यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत नवाब मलिकांचाही ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांची पाठराखन केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने आज राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळाने आज भाजप नेत्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण भाजपने वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतो, असं म्हटलं. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे भाजपने (BJP) महाविकास आघाडीचा प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने प्रस्ताव नाकारल्याने राज्यसभा निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानास परवानगी मिळाली तर महाविकास आघाडीचं गणित साजेसं ठरु शकतं.

"अनिल देशमुख आणि नवाब मलिकांवर अन्याय"

तर दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी काहीही केल नसताना त्यांना अटक केली. या दोन्ही नेत्यांवर अन्याय करण्यात आला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आमचा कोर्टावर विश्वास असून आज नाहीतर उद्या त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे देशमुख कुटुंबावर १०९ वेळा छापे टाकून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवावे. आज ना उद्या कोर्ट त्यांना क्लीन चिट देईल. केंद्राच्या विरोधात बोलणाऱ्यावर छापेमारी केली जाते. तसेत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना मतदानाची संधी द्यावी, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

supriya sule, nawab malik, anil deshmukh
नोटांवर दिसणार आता टागोर-कलामांचा फोटो?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com