खासदार राजू शेट्टी वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी आज पत्रकार परीषद घेत साखर कारखाना घोटाळ्यापेक्षा वीज वितरण कंपनी घोटाळा मोठा आहे व तो घोटाळा मी लवकरच बाहेर काढणार आहे असा थेट इशाराच दिला आहे.
आज जाहीर पत्रकार परीषद घेत राजू शेट्टी ह्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीलाही त्यांनी इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, "सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे सरकारवर आम्ही शंभर टक्के विश्वास ठेवणार नाही. या पूर्वी सरकारने फसवले आहे. त्यामुळे जन आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावणार" ह्या शब्दांत राजू शेट्टी यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
"शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु, तो अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर साप वन्यजीव नाही म्हणून शेतकऱ्याला मदत मिळत नाही. परंतु, शेतकऱ्याने सापाला मारले तर वन्यजीव मारला म्हणून शेतकऱ्यावर कारवाई होते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर धरणे बांधली आणि विजनिर्मिती करण्यात आली.परंतु, याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही", अशी खंत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व माहिती गोळा करायचे काम सुरु असून या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.