लसीकरणावरून राजेश टोपेंचा केंद्रावर हल्लाबोल
लसीकरणाबाबत महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने देशात अग्रेसर असून याची कल्पना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना नक्कीच आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला अखंडित लस पुरवठा करावा त्यासाठीचे शंभर टक्के नियोजन आम्ही केले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. लसीचे डोस फुकट जाण्याचे प्रमाणही राज्यात खूप कमी आहे.
राज्यातील कोरोना रुग्ण व लोकसंख्येची आकडेवारी केंद्राकडे असल्याने महाराष्ट्राला लसीचे किती डोस दिले पाहिजे याची नेमकी आकडेवारीही केंद्राकडे नक्कीच असायला हवी असेही राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यांनी कसे नियोजन करावे हे सांगण्यापेक्षा हर्षवर्धन यांनी अखंडित लस पुरवठा कसा करणार ते सांगितले तर बरे होईल, असा टोलाही राजेश टोपे यांनी लगावला.