Sidhhudurg District Bank Election | राजन तेली यांचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Sidhhudurg District Bank Election | राजन तेली यांचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Published by :
Published on

समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग | संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला. या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने ११ जागांवर विजय मिळवत बँकवर सत्ता काबीज केली आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला ८ जागावर समाधान मानावे लागले. मात्र जिल्ह्यात भाजपा जिंकून सुद्धा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अचानक राजीनामा दिल्याची घटना घडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळजनक घटना घडली आहे.

या निवडणुकीत भाजपने जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. पतसंस्था मतदार संघातून राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत नाईक यांनी तेलींचा पराभव केला.

जिल्हा बँक निवडणूकीत भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com