Raj thackrey यशस्वी शस्त्रक्रिया; आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

Raj thackrey यशस्वी शस्त्रक्रिया; आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

Published by :
Published on

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. त्यांच्या कमरेजवळचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर शनिवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, आता ते रुग्णालयातून घरी परतरणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी लॉकडाऊनसंदर्भात काही चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com