Raj Thackeray
Raj Thackeray

राज ठाकरेंची मोठी घोषणा; अयोध्या दौऱ्याची तारीख केली जाहीर

Published by :
Published on

राज्य़ातील मशिदीवरून भोंगे उतरवण्याच्या मुद्दयावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता अयोध्या दौऱ्याची (Ayodhya Tour) तारीख जाहीर केली आहे. येत्या 5 जूनला ते अयोध्या दौरा (Ayodhya Tour) करणार आहेत. या दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत टीकाकारांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली. तसेच ५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे.

...तर जशास तसे उत्तर देणार

देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा. ३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही.

माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे. तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com