राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची जागा घेणार;चंद्रकांत खैरे म्हणाले...
सचिन बडे,औरंगाबाद |मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या विविध मुद्यावरून आक्रमक होताना दिसत आहे. मग तो मशिदींवरील भोग्यांचा विषय असो अथवा मशिदींसमोर हनूमान चालीसा म्हणण्याचा विषय. या सर्व भूमिकानंतर आता त्यांना हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखेच (Balasaheb Thackeray) हिंदूजननायक अशी उपाधी देण्यात आली आहे.त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची जागा घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेवर आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदुत्वासाठीच्या आक्रमक भूमिकेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जनतेने हिंदूजननायक अशी उपाधी दिली होती. तसेच ते बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) जागा घेऊ शकतात अशीही चर्चा सुरू झाली आहे. यानंतर आज पुण्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याची घोषणा केली.या घोषणेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) हे बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय व्युहरचना आखत असल्याचे अधोरेखीत झाले. कारण मराठवाड्यात त्या काळी बाळासाहेबांनी घेतलेली ती सभा शिवसेनेसाठी निर्णायक ठरली होती. इथुनच शिवसेनेने मराठवाड्याच्या मैदानात पाय रोवले आहे. यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेत असल्याच्या चर्चेला ऊत आले आहे.
या सर्व चर्चेवर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाऱखी सभा ही झालेली नाही.तसेच शिवसेना प्रमुखांचा रेकॉर्ड कोणीही मायकलाल करू शकत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जागा घेण्याचा कोणीही प्रयत्न करू शकत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दिली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर कोणीही हिंदू हृदय सम्राट बनण्याचा प्रयत्न केला तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुरुदयसम्राट नंतर दुसरे कोणीही होऊ शकत नाही. राज ठाकरे सध्या जे काही करत आहे, त्यांना अप्रत्यक्षपणे भाजप पाठिंबा देत असल्याची प्रतिक्रियाही देखील खैरे (Chandrakant Khaire) यांनी दिली.