राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे रवाना; औरंगाबादच्या सभेची तयारी सुरू
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गेले काही दिवस चर्चेत असलेल्या औरंगाबादमधल्या सभेसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. भगवी शाल अंगावर घेऊन राज ठाकरे मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानाहून रवाना झाले. त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा आहे. राज ठाकरे आज मुंबईतून (mumbai) पुण्यात (pune) जाणार आहेत आणि उद्या ते औरंगाबादमध्ये पोहोचतील. मुंबईपासून औरंगाबादपर्यंत राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्याची तयारी मनसैनिकांनी केली. तिकडे औरंगाबादमध्ये सभेला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर सभेच्या तयारीला वेग आला. राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम पुण्यात असेल.
राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' अटी-शर्ती :
ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
वाहन पार्किंगचे नियम पाळावे
सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये