राज ठाकरेंच्या अजितदादांवरील टीकेवर अमोल मिटकरी म्हणाले...
पुण्यातील पूरपरिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांना टोला लगावला. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारीबहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करु शकले नाहीत. राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकोल्या दाखवण्यासारखा आहे.
यासोबच ते पुढे म्हणाले की, सुपारीबहाद्दर लोकांकडून जनतेनं योग्य तो धडा घेतलेला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा लाँग फॉर्म माहित नाही. तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनेवर बोलतो आहे. म्हणजे मला असं वाटते अलिकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे. असे अमोल मिटकरी म्हणाले.