Railway Megablock | ‘या’ मार्गावर लोकल धावणार नाहीत

Railway Megablock | ‘या’ मार्गावर लोकल धावणार नाहीत

Published by :
Published on

रेल्वे प्रशासनाकडून आजही मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडून आज विविध कामांसाठी हा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर आज पाच तास मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 ब्लॉक राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत आणि पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मेगाब्लॉक कालावधीमध्ये बेलापूर ते नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या ट्रेन वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहे. बेलापूर ते खारकोपर या स्थानकांदरम्यानची सेवा सुरु राहणार आसून नेरुळ ते खारकोपर सेवा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून ट्विट द्वारे देण्यात आली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती मध्य रेल्वेकडून ट्विटद्वारे देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com