किल्ले रायगडावर अस्थिविसर्जनाचा घाट; शिवप्रेमींनी पाडला हाणून

किल्ले रायगडावर अस्थिविसर्जनाचा घाट; शिवप्रेमींनी पाडला हाणून

Published by :
Published on

किल्ले रायगडावरील शिवाजी महाराज यांच्या समाधीला राख मिश्रित लेप लावणे आणि पुस्तकाचे पूजन करणाऱ्या दोन पुण्यातील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राख मिश्रित लेप प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.अस्थी मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र त्या अस्थी नसून फुल,अष्टगंध,अत्तर यांचे मिश्रण असल्याचे सौरभ कर्डे यांनी दावा दिलाय.

बुधवारी दुपारी किल्ले रायगडावर पुण्याहून सौरभ आणि त्याचे मित्र आले होते. शिवप्रेमींना जगदीश्वर मंदिरा जवळच्या चौथऱ्यावर काही व्यक्तींच्या हालचाली या संशयास्पद असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी या संशयास्पद व्यक्तींचा पाठलाग केला.चार ते पाच व्यक्ती या जगदिश्वर मंदिरा जवळच्या चौथऱ्यावर मंत्रोच्चार करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला लेप लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याठिकाणी पुस्तकाचे पूजन देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांना शिवप्रेमींनी रोखले होते. गडावर काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

असे कोणतेही कृत्य करण्यात आले नसल्याचे सौरभ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. संशयित व्यक्तींचे महाड येथील तालुका पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आले असून त्यांच्याकडील राख मिश्रित लेप ताब्यात घेऊन रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यानंतर या घटने मागच सत्य समोर येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com