Speaker Election : अपक्ष, मनसेच्या साथीने भाजपच्या राहुल नार्वेकरांचा दणदणीत विजय
Maharashtra assembly speaker election updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात झाला. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी उमेदवारी आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी व्हिप जारी केले आहे. परंतु शिंदे गटाने शिवसेनाचा व्हिप झुगारला. यामुळे राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. राहुल नार्वेकर यांना राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळाली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते पडली. तर शिवसेनेचे राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर यांचा मोठ्या फरकाने विजया झाला. या विजयानंतर भाजप व शिंदे गटातील आमदारांनी टाळ्या वाजवून आणि घोषणा देत त्यांचे स्वागत केलं. तर विधानभवन परिसरात भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या साथीने पहिली लढाई जिंकली आहे. आता सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत नार्वेकर
राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर ते 2019 मध्ये कुलाबा मतदार संघातून निवडून आले. यापूर्वी ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुलचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाबा भागातील नगरसेवक होते. राहुलचा भाऊ मकरंद नार्वेकर हे सध्या नगरसेविक आहेत
नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये सामील झाले.
आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.
राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते.
राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत.
राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.