राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयकडून घोषणा

राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयकडून घोषणा

Published by :
Published on

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवीन कोच मिळणार आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडची या पदासाठी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी राहुल द्रविडकडे पदभार देण्यात येणार आहे. राहुल द्रविडनेही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. हा अर्ज स्विकारला गेला आहे. त्यामुळे राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com